इन्स्टाग्रामवरून ओळख, अल्पवयीन मुलीचा गैरफायदा; अश्लील फोटो पाठवून धमकी देणारा आरोपी ताब्यात
अमरावती, 03 मे (हिं.स.) वरुड तालुक्यातील बेनोडा येथे अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत अश्लील फोटो व व्हिडिओद्वारे धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणाऱ्या गुन्ह्यांबाब
इन्स्टाग्रामवरून ओळख, अल्पवयीन मुलीचा गैरफायदा; अश्लील फोटो पाठवून धमकी देणारा आरोपी बेनोडा पोलिसांच्या ताब्यात


अमरावती, 03 मे (हिं.स.)

वरुड तालुक्यातील बेनोडा येथे अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत अश्लील फोटो व व्हिडिओद्वारे धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणाऱ्या गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबु हसन उर्फ बबलु हसन (वय २२, रा. मुरादाबाद, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. ओळखीतून मैत्री वाढली आणि त्याच दरम्यान मुलीने काही वैयक्तिक फोटो आरोपीला पाठवले होते.दरम्यान, ५ जानेवारी २०२६ रोजी आरोपी उत्तरप्रदेशवरून नागपूर येथे आला आणि पीडितेला भेटण्यासाठी बोलावले. या भेटीदरम्यान मुलीच्या इच्छेविरुद्ध गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर दोघांमध्ये वाद झाल्याने पीडितेने आरोपीचा संपर्क पूर्णपणे तोडून त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला.यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने पीडितेचे अर्धनग्न व आक्षेपार्ह फोटो तिच्या आई व आजीला व्हॉट्सअॅपवर पाठवले. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने कुटुंबीयांसह बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१)(२), ७८(२), ७९, ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ३० तारखेला आरोपीला अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.या प्रकरणामुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना विशेष खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच पालकांनीही मुलांच्या ऑनलाईन वावरावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande