छ.संभाजीनगर : अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या नव्या सुविधांमुळे रुग्णांना अधिक जल
छ.संभाजीनगर : अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात


छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला.

या नव्या सुविधांमुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक व दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नव्या मशिनरीमुळे निदान व उपचार प्रक्रियेत मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगितले. विशेषतः गंभीर रुग्णांसाठी वेळेवर उपचार मिळणे अधिक सुलभ होणार असून, रुग्णालयाच्या सेवेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. असे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.

नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णसेवा अधिक सक्षम, वेगवान आणि विश्वासार्ह होणार असून, छत्रपती संभाजीनगरसह परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande