अंबाजोगाईच्या कल्याणी चिक्षे हिचा अमेरिकेत सन्मान
बीड, 03 मे (हिं.स.)।कल्याणी चिक्षे हिला अमेरिका येथे मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन सिस्टिम्स ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सन्मानित करण्यात आले आहे. कल्याणीचे शालेय शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालय व महाविद्यालयात बारावीपर्यंत प
अंबाजोगाईच्या कल्याणी चिक्षे हिचा अमेरिकेत सन्मान


बीड, 03 मे (हिं.स.)।कल्याणी चिक्षे हिला अमेरिका येथे मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन सिस्टिम्स ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सन्मानित करण्यात आले आहे.

कल्याणीचे शालेय शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालय व महाविद्यालयात बारावीपर्यंत पूर्ण झाले. आठवीपासूनच तिने विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शिष्यवृत्ती व पारितोषिके प्राप्त केली. एमटीएसई परीक्षेत तिने सलग तीन वर्षे राज्यस्तरीय गुणवत्ता क्रमांक मिळवला. आठवीपासून विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना तिला किरण कोदरकर व कौस्तुभ कोदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. बारावीमध्ये तिला टॉप प्रमाणपत्र मिळाले तसेच अभियांत्रिकी शिक्षणादरम्यानही तिला शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्यानंतर तिने अंबाजोगाईतील अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली.

अंबाजोगाईच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वारशातून प्रेरणा घेत कल्याणीला अमेरिकेत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. विवाहानंतर सॅन डिएगो येथे वास्तव्यास असताना तिने मास्टर्स करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात तिचे पती राजेश कुलकर्णी तिला सातत्याने प्रेरणा व मोलाचे पाठबळ दिले. कल्याणीने माहिती प्रणाली या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करताना शिष्यवृत्तीही प्राप्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande