
छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसााठ यांच्या उपस्थितीत या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ तसेच अयोध्या नगरी येथील अत्याधुनिक घनकचरा हस्तांतरण केंद्राचे लोकार्पण अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
पालकमंत्री म्हणून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छता हीच खरी प्राथमिकता आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. हा उपक्रम केवळ कचरा व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून, भविष्यातील स्वच्छ, सुंदर आणि हरित छत्रपती संभाजीनगर घडविण्याचा भक्कम पाया आहे.
शास्त्रोक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घनकचऱ्याचे संकलन, योग्य वाहतूक आणि वैज्ञानिक पद्धतीने हस्तांतरण केल्यामुळे शहरातील स्वच्छतेचा दर्जा निश्चितच उंचावणार आहे. यामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होईल.
आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे उद्दिष्ट साध्य होणार नाही. चला, आपण सर्व मिळून “स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि हरित शहर” या संकल्पनेला वास्तवात उतरवू या असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis