माद्रिद ओपन : मार्टा कोस्त्युकने मिरा अँड्रीवाला पराभूत करत पटकावले विजेतेपद
माद्रिद, 03 मे (हिं.स.)माद्रिद ओपन २०२६ जिंकून मार्टा कोस्त्युकने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद पटकावले आहे. या २३ वर्षीय युक्रेनियन टेनिसपटूने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या मिरा अँड्रीवाला ६-
मार्टा कोस्त्युक


माद्रिद, 03 मे (हिं.स.)माद्रिद ओपन २०२६ जिंकून मार्टा कोस्त्युकने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद पटकावले आहे. या २३ वर्षीय युक्रेनियन टेनिसपटूने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या मिरा अँड्रीवाला ६-३, ७-५ असे पराभूत केले. आता सोमवारच्या डब्ल्यूटीए क्रमवारीत कोस्त्युक जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावरून कारकिर्दीतील सर्वोच्च १५ व्या स्थानावर झेप घेणार आहे. डब्ल्यूटीए १००० विजेतेपद हे कोस्त्युकचे तिसरे विजेतेपद असून, आता पॅरिसमध्ये २४ मे रोजी सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनसाठीच्या संभाव्य विजेत्यांच्या वाढत्या यादीत तिच्या नावाची भर पडली आहे.

आत्ता इथे उभे राहणे अविश्वसनीय वाटते. या टप्प्यावर पोहोचायला मला अनेक वर्षे लागली. माझ्या मनात एकच शब्द येतो, तो म्हणजे 'सातत्य'. याचा अर्थ दररोज उपस्थित राहणे. गेल्या वर्षभरात मी हे खूप चांगल्या प्रकारे करत आहे, त्यामुळे मला स्वतःचा आणि माझ्या संघाचा खूप अभिमान वाटतो, असे कोस्त्युकने सांगितले. मी इथे विजेतेपद पटकावेन, असा विचार मी कधीच केला नव्हता, असे कोस्त्युक ट्रॉफी वितरण समारंभादरम्यान ती म्हणाली.

या विजयामुळे कोस्त्युकने आपल्या कारकिर्दीतील अव्वल १० टेनिसपटूंवरील १४ वा विजय नोंदवला आणि माद्रिदमधील तिचा शानदार पंधरवडा पूर्ण झाला. यापूर्वी तिने तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर असलेल्या जेसिका पेगुलाचा पराभव केला होता आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच सेट गमावला होता, जो उपांत्य फेरीत अनास्तासिया पोतापोव्हाविरुद्ध होता. या विजयाने कोस्त्युकसाठी स्पेनमधील एका वर्चस्वपूर्ण आठवड्याची सांगता झाली, जिने २६ व्या मानांकित टेनिसपटू म्हणून प्रवेश केला होता. पण विजेतेपदाच्या मार्गावर जेसिका पेगुला, लिंडा नोस्कोव्हा आणि मिरा अँड्रीवाला यांसारख्या टेनिसपटूंना पराभूत केले. काही आठवड्यांपूर्वी रूएनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर, या विजयामुळे तिला सलग दुसरे विजेतेपद मिळाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande