विेनेश फोगाटचे डब्लूएफआयचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप
नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.)भारतीय कुस्ती विश्वात पुन्हा एकदा एक मोठे वादाचे वादळ निर्माण झाले आहे. ऑलिम्पियन विनेश फोगाटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात तक्र
विनेश फोगाट


नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.)भारतीय कुस्ती विश्वात पुन्हा एकदा एक मोठे वादाचे वादळ निर्माण झाले आहे. ऑलिम्पियन विनेश फोगाटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंपैकी ती एक आहे. या प्रकरणात विनेशने स्वतःला पीडित म्हणून जाहीरपणे ओळख देण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिने एक भावनिक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला असून, काही विशिष्ट परिस्थितीमुळे तिला आपले मौन सोडावे लागले असल्याचे म्हटले आहे.

विनेश फोगाटने सांगितले की, हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित असल्याने तिला सुरुवातीला या प्रकरणात आपली ओळख उघड करायची नव्हती. ती म्हणाली, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही पीडितेची ओळख उघड करू नये, कारण हा त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेशी संबंधित विषय आहे. पण आज, काही विशिष्ट परिस्थितीमुळे, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. खटला प्रलंबित असताना मला काही बोलायचे नव्हते... पण मला हे सांगायचे आहे की, तक्रार दाखल करणाऱ्या सहा पीडितांपैकी मी एक आहे आणि आमची साक्ष अजूनही सुरू आहे. सत्य देशासमोर उघड होईल. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, तक्रार दाखल करणाऱ्या सहा पीडितांपैकी मी एक आहे.

विनेश म्हणाली की, अशा परिस्थितीत एका महिला खेळाडूसाठी स्पर्धा करणे अत्यंत कठीण असते. ती म्हणाली, अशा परिस्थितीत एका महिलेसाठी स्पर्धा करणे खूप कठीण आहे आणि अशा परिस्थितीचा सामना केलेली प्रत्येक खेळाडू हे समजू शकते.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत विनेश म्हणाली, नमस्कार सर्वांना. सर्वांना माहीत आहेच की, मी गेल्या दीड वर्षापासून कुस्तीच्या मॅटपासून दूर आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मी कुस्तीची तयारी करत आहे. मी खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी देशासाठी पदके जिंकली आहेत, त्याचप्रमाणे देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पाठिंब्याने, मला पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरून देशासाठी अनेक पदके जिंकायची आहेत आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवायचा आहे.

विनेश फोगाटने खुलासा केला की, आपली ओळख उघड करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे डब्ल्यूएफआयने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रँकिंग स्पर्धा आणि चाचण्या घेण्याचा घेतलेला निर्णय. वास्तविक पाहता, गोंडा येथे 'सिनियर ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धा' आयोजित केली जाणार आहे. तिने आरोप केला की, ही स्पर्धा ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या खाजगी महाविद्यालयात आयोजित केली जात आहे, ज्यामुळे निष्पक्ष स्पर्धेची अपेक्षा करणे कठीण झाले आहे.

ती म्हणाली, सुमारे एक महिन्यापूर्वी, कुस्ती महासंघाने एका स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेचे ठिकाण उत्तर प्रदेशातील गोंडा आहे. ब्रिजभूषण यांचे घर तिथेच आहे. त्याचे स्वतःचे खाजगी महाविद्यालय आहे आणि ही स्पर्धा तिथेच आयोजित केली जात आहे. तिथे प्रत्येक मेहनती खेळाडूला त्याचा योग्य मान मिळेल, याची शक्यता खूपच कमी, किंबहुना अशक्यच आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande