रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी आनंद वीरकर
रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमेय ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे संस्थापक आनंद वीरकर यांची एकमताने निवड झाली. मुंबईत झालेल्या अधिवेशनाच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या आमदार सौ. चित्रा वाघ
रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी आनंद वीरकर


रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमेय ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे संस्थापक आनंद वीरकर यांची एकमताने निवड झाली.

मुंबईत झालेल्या अधिवेशनाच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या आमदार सौ. चित्रा वाघ यांनी ही जबाबदारी आनंद वीरकर यांच्यावर सोपवली. या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संस्था, सुवर्णकारागीर, व्यापारी बंधू आणि दैवज्ञ बांधवांकडून आनंद वीरकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

दैवज्ञ हितावर्धक नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभेमध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दैवज्ञ पतसंस्थेच्या संचालकांचा झालेला गौरव ही संस्थेला भूषणावह अशी घटना आहे, असे विजय पेडणेकर यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक अनिल उपळेकर, राजन कारेकर, सेक्रेटरी सौ. रत्ना आचरेकर, सौ. अंजली पेडणेकर आणि कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande