
ठाणे, 03 मे (हिं.स.)। वर्ष सुरु होण्याआधि अनेक शाळांमध्ये फी वाढ, गणवेश खरेदी, पुस्तक खरेदी, सिलॅबस समंदी आक्षेप विविध ऍक्टिव्हिसाठी वेगळी आकारणी, शिक्षकांच्या अरेरावी बाबत तक्रारी अशा अनेक मुद्यांवरून पालक आणि आज संचालकांमधे संघर्ष, मतभेद होतात.
आमदार संजय केळकरांकडे विविध शाळांचे पालक मोठ्या संख्येने भेटतात त्यामधे CBSC शाळांचा समावेश अधिक आहे. सरस्वती स्कुल राबोडी येथील समस्या, आक्षेप फी वाडी बाबत होते ते मार्गी लागले असून होरायझन शाळे बाबत नुकतीच संस्थाचालक व पालक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व तक्रारी बाबत चर्चा होऊन पालकांनी उपस्थित केलेले मुद्दे मार्गी लागल्याचे आ. संजय केळकर यानी सांगितले.
शासनाच्या परिपत्रकाच्या बाहेर जाऊन सी बी एस सी च्या शाळांनी मनमानी करू नये तसेच नियमाच्या बाहेर जाऊन कोणतीही आकारणी करु नये असे आवाहन या संजय केळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर