
छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। हजारो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आणि एका क्लिकसोबत बारावीच्या निकालाने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला, तर काहींच्या डोळ्यांत मेहनतीचे अश्रू तरळले. गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास, ताण, अपेक्षा आणि भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा क्षण आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. अशाच उत्सुकतेच्या वातावरणात छत्रपती संभाजीनगर विभागाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून विभागाने यंदा ८८.६८ टक्के निकाल नोंदवला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकालऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागाचा एकूण निकाल ८८.६८ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्क्यांची
घसरण नोंदविण्यात आली आहे. विभागात यंदा कॉपीमुक्ती अभियानाची कठोर अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे निकालावर त्याचा परिणाम झाल्याचे मानले जात आहे.
विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी निकालाची घोषणा करताना सांगितले की, यंदा विभागातून १ लाख ८४ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी
्
नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८२ हजार ६८८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले आणि त्यातील १ लाख ६२ हजार २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९२.२४ इतका असून मुलांच्या तुलनेत त्यांनी आघाडी घेतली आहे.
विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याने ९०.८२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. त्याखालोखाल बीड जिल्ह्याने ९०.१४ टक्के निकालासह दुसरा क्रमांक मिळवला. परभणी जिल्हा ८७.६९ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यांचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिला. यंदा विभागात कॉपीमुक्त परीक्षा राबविताना प्रशासनाने कडक भूमिका घेतली. परीक्षेदरम्यान एकूण ५८ गैरमार्गाची प्रकरणे समोर आली. त्यापैकी ५६ प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली असून, ५४ विद्यार्थ्यांच्या संबंधित विषयांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. तर २ विद्यार्थ्यांना निर्दोष घोषित करून त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis