
बीड, 03 मे (हिं.स.)।उपळी धरणातून आमदार प्रकाश सोळंके व सभापती जयसिंह सोळंके यांच्या हस्ते कुंडलिका नदीपात्रात पाणी सोडल्याने १० ते १२ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतपीक, पशुधन व नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदीपात्राशेजारील गावांना तीव्र पाणीटंचाईचे संकट भेडसावत होते. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होत होती. आमदार सोळंके यांनी संबंधित पाटबंधारे विभागाशी चर्चा करून पाणी सोडल्याने उपळी, कुप्पा, लोणवळ, बाबी, दुकडेगाव, चिंचाळा, परडी माटेगाव, केडेपिंप्री आदी गावांतील शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांसह पशुधनाचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आमदार सोळंके व सभापती जयसिंह सोळंके यांचे आभार मानले.
नागरिकांसाठी तसेच जनावरांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. तसेच प्रकल्पाखालील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis