
लातूर, 03 मे (हिं.स.) येथील व्ही एस पँथर्स युवा संघटन आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित 7व्या सर्वधर्मीय सामुहीक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन मस्के यांच्या अध्यक्षतेखाली भालचंद्र ब्लड बँक येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली . यावेळी सचिन मस्के यांनी विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी विविध समित्या जाहीर केल्या त्यामध्ये भोजन समिती प्रमुख पदी ऍड किरण पायाळ ,पार्किंग समिती प्रमुख पदी हुसेन मांदळे रुखवत समिती प्रमुख पदी विनोद वाघचौरे, धम्मा वाघचौरे, मुस्कान शेख ,विवाह विधी समिती प्रमुख पदी आबासाहेब गायकवाड , पाणी वाटप समिती प्रमुख पदी अविष्कार कांबळे, समीर शेख यांची निवड करण्यात आली .
विविध समिती प्रमुखांना मदत करण्यासाठी संघटनेतील सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत राहतीलअशा प्रकारच्या सूचना सचिन मस्के यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष त्याचा माजी नगरसेवक सचिन मस्के मार्गदर्शक रवी कुरील संपर्कप्रमुख आनंद जाधव मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रीतम दंडे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष देवा गायकवाड ग्रुप जिल्हाध्यक्ष अजय सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख शहराध्यक्ष असदभाई शेख, कामगार आघाडी शहराध्यक्ष गौस भाई शेख कामगार आघाडी जिल्हा संघटक गोविंद कांबळे, ग्रुप जिल्हा संघटक सुरज सूर्यवंशी कामगार आघाडी जिल्हाउपाध्यक्ष हुसेन मांदळे, जिल्हाउपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड,औसा तालुकाध्यक्ष सुनील सातपुते औसा शहराध्यक्ष महेश कांबळे वाहतूक आघाडी शहराध्यक्ष शाहरुख मणियार,रेनापुर तालुकाध्यक्ष राज तरकसे , विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष अविष्कार कांबळे महिला आघाडी तालुकाध्यक्ष मुस्कान शेख ,नंदिनी घोडके,यासिन शेख,अतुल होळकर, मनोज गायकवाड ,अजहर शेख , विलास कसबे, गणेश कसबे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते .
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis