अमरावतीत फिजिओ थेरपीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
अमरावती, 03 मे (हिं.स.) | फिजिओथेरपी करण्याच्या बहाण्याने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिला शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची घटना जिल्ह्यात घडली. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीचा प्रयत्न करण्यात आला. शहराच्या राजापेठ आणि फ्रेजर
अमरावतीत फिजिओ थेरपीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी


अमरावती, 03 मे (हिं.स.) | फिजिओथेरपी करण्याच्या बहाण्याने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिला शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची घटना जिल्ह्यात घडली. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीचा प्रयत्न करण्यात आला.

शहराच्या राजापेठ आणि फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. राजापेठहद्दीतील घडलेल्या घटनेत महिला फिजिओथेरपी करिता संशयित आशिष चौधरी (वय ४५) याच्याकडे गेली होती. उपचारासाठी उपकरण लावत असताना संशयित आशिष हा महिलेला स्पर्श करीत होता. संशयिताने पीडितेच्या घरापर्यंत पाठलाग केला. काही दिवसांनी त्याच उपचाराकरिता संशयित पीडित महिलेच्या घरी गेला. तुम्ही खूप आवडता, असे म्हणून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली, पीडितेचा हात पकडला, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला.

राजापेठ पोलिसांनी त्याआधारे संशयित आशिष चौधरी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अन्य घटनेत पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील मजुरीसाठी घराबाहेर पडल्याची संधी बघून संशयित हिंदल पांडुरंग चव्हाण (वय ४५) याने घरात शिरून टीव्ही सोबत बघण्याच्या बहाण्याने पीडितेचा हात पकडून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करून घरातून पळ काढला. घरी आल्यानंतर आईला माहिती दिली. आईने संशयित हिंदल चव्हाणला हटकले असता त्याने पोलिस तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करून पीडितेला संपविण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित हिंदल चव्हाणविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande