अटलांटिकमध्ये रशियन तेलवाहू टँकर जप्त; फ्रान्सच्या कारवाईवर मॉस्को संतप्त
मॉस्को, 01 जून (हिं.स.)। फ्रान्सने आज, सोमवार (१ जून) रोजी अटलांटिक महासागरात रशियाशी संबंधित एका तेलवाहू टँकरला ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा रशियाने तीव्र निषेध केला असून ती बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपल्या सागरी वाहतूक आणि जहाजां
अटलांटिकमध्ये रशियन तेलवाहू टँकर जप्त; फ्रान्सच्या कारवाईवर मॉस्को संतप्त


मॉस्को, 01 जून (हिं.स.)। फ्रान्सने आज, सोमवार (१ जून) रोजी अटलांटिक महासागरात रशियाशी संबंधित एका तेलवाहू टँकरला ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा रशियाने तीव्र निषेध केला असून ती बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपल्या सागरी वाहतूक आणि जहाजांच्या सुरक्षेसाठी मॉस्को कठोर पावले उचलेल, असा इशाराही रशियाने दिला आहे.

वृत्तानुसार, ‘टॅगोर’ या टँकरला ताब्यात घेण्यात आल्याबद्दल क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी फ्रान्सच्या कारवाईवर टीका केली. त्यांनी म्हटले की, “आम्ही अशा प्रकारच्या कारवाया बेकायदेशीर मानतो. या जहाजाला ताब्यात घेणे हे आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या सीमेलाही स्पर्श करणारे पाऊल आहे.”क्रेमलिनने पुढे सांगितले की, रशिया आपल्या सागरी मालवाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करत असून या घटनेनंतरही त्या सुरू ठेवणार आहे.रशियाची ही तीव्र प्रतिक्रिया फ्रान्सने ‘टॅगोर’ला ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतर आली. या टँकरचा रशियाच्या तथाकथित ‘शॅडो फ्लीट’ (छाया ताफा) चा भाग असल्याचा संशय आहे. पश्चिमी देशांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर घातलेल्या निर्बंधांना चुकवण्यासाठी अशा जहाजांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, हे जहाज अटलांटिक महासागरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात ब्रिटन आणि इतर सहयोगी देशांच्या मदतीने रोखण्यात आले.मॅक्रॉन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय निर्बंधांना चकवा देणे, समुद्री कायद्याचे उल्लंघन करणे आणि रशियाने युक्रेनविरुद्ध सुरू ठेवलेल्या युद्धाला आर्थिक मदत करणे हे अस्वीकार्य आहे.फ्रेंच अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा टँकर उत्तर-पश्चिम रशियातील मुरमान्स्क येथून निघाला होता आणि कॅमेरूनच्या दिशेने जात होता. मात्र, ब्रिटनी किनाऱ्यापासून ४०० हून अधिक सागरी मैल पश्चिमेला त्याला अडवण्यात आले.अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे जहाज कॅमेरूनचा बनावट ध्वज वापरून प्रवास करत होते. सध्या या जहाजाला पुढील तपासासाठी फ्रेंच नौदलाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

यासंदर्भात फ्रेंच सागरी अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘टॅगोर’ हे जहाज आधीपासूनच युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्या निर्बंधांच्या यादीत होते. तसेच, या जहाजाने यापूर्वी अनेकदा आपला ध्वज बदलला होता. या प्रक्रियेला ‘फ्लॅग-हॉपिंग’ असे म्हटले जाते. सप्टेंबरपासून फ्रान्सने रशियाशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक इतर टँकरांविरोधातही कारवाई केली आहे. यापैकी काही जहाजांना दंड भरल्यानंतर नंतर सोडून देण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande