जांगमी चक्रीवादळामुळे जपानमध्ये हाहाकार; ९ जण जखमी; ३०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द
टोकियो , 02 जून (हिं.स.)।जपानमध्ये उष्णकटिबंधीय वादळ जांगमी (टायफून क्रमांक-६) च्या प्रभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार दुपारपर्यंत वादळाशी संबंधित घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले असून, ओकिनावा आणि कागोशिमा प्रांतांतील ४७ हजारांहून अधिक घरांचा
जांगमी चक्रीवादळामुळे जपानमध्ये हाहाकार; ९ जण जखमी; ३०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द


टोकियो , 02 जून (हिं.स.)।जपानमध्ये उष्णकटिबंधीय वादळ जांगमी (टायफून क्रमांक-६) च्या प्रभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार दुपारपर्यंत वादळाशी संबंधित घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले असून, ओकिनावा आणि कागोशिमा प्रांतांतील ४७ हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जपान हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११:४५ वाजेपर्यंत जांगमी हे वादळ कागोशिमा प्रांतातील याकुशिमा बेटाच्या सुमारे १४० किलोमीटर नैऋत्येस स्थित होते आणि ते ताशी ३० किलोमीटर वेगाने ईशान्य दिशेने सरकत होते. वादळाच्या केंद्रातील हवेचा दाब ९७५ हेक्टोपास्कल नोंदवण्यात आला असून, केंद्राजवळील वाऱ्यांचा वेग प्रत सेकंद २५ मीटरपर्यंत पोहोचत आहे.

मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळपर्यंत कागोशिमा आणि ओकिनावा येथे सहा घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि जोरदार वाऱ्यांमुळे वस्तू उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. जखमी झालेल्या सर्व नऊ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

वादळामुळे दोन्ही प्रांतांतील सुमारे ४७,९३० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वाहतूक सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन द्रुतगती मार्गांवरील १५ विभाग बंद करण्यात आले आहेत, तर एका रेल्वे मार्गावरील सेवा स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय, आणखी सहा रेल्वे ऑपरेटरांनी १९ रेल्वे मार्गांवरील सेवा बंद ठेवण्याची योजना आखली आहे.

खराब हवामानामुळे विशेषतः क्यूशू प्रदेशातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या ३०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सागरी वाहतुकीवरही परिणाम झाला असून, किंकी, शिकोकू, क्यूशू आणि ओकिनावा प्रदेशांतील ५७ कंपन्यांच्या ६४ जलवाहतूक मार्गांवरील सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

सरकारने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू केले आहे. किहारा यांनी इशारा दिला की, बुधवारी सकाळपासून टोकियो महानगर क्षेत्रातील वाहतूक सेवांवरही परिणाम होऊ शकतो. त्यांनी नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या स्थलांतरविषयक सूचनांचे पालन करण्याचे आणि वेळेवर सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.

हवामान विभागाने जोरदार वारे, उंच समुद्री लाटा, वादळी भरती, भूस्खलन, पूरस्थिती आणि नद्यांना येणारा पूर याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, जांगमी मंगळवारी दक्षिण क्यूशूच्या जवळ पोहोचू शकतो. त्यानंतर बुधवारी तो होंशूच्या दक्षिण किनाऱ्यालगत ईशान्य दिशेने सरकत शिकोकू आणि कांतो प्रदेशांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

वादळाच्या केंद्राच्या उत्तर आणि पूर्व भागात सक्रिय असलेल्या घनदाट पावसाळी ढगांमुळे त्याच्या आगमनापूर्वीच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कागोशिमा प्रांतातील अमागी शहरात गेल्या २४ तासांत २०९.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, जून महिन्यासाठी हा नवा विक्रम ठरला आहे.

हवामान विभागाने बुधवारी सकाळपर्यंत टोकाई आणि किंकी प्रदेशांत ३५० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच इझू बेटांमध्ये ३०० मिमी, शिकोकूमध्ये २५० मिमी, उत्तर क्यूशू आणि कांतो-कोशिन प्रदेशात २०० मिमी, तर दक्षिण क्यूशूमध्ये १८० मिमीपर्यंत पाऊस पडू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande