
धुळे, 01 जून (हिं.स.) : धुळे शहरात चोरट्यांचा हैदोस सुरुच असून साक्रीरोडवरील अरुणकुमार वैद्य नगरातील झुलेला सोसायटीत एका किराणा दुकानदाराचे घर फोडुन चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घराचे रिनोव्हेशनचे काम सुरु असल्याने घरमालक मोहनलाल हिरवाणी हे सध्या जवळच्याच घरात राहत असून याचा ङ्गायदा उचलीत चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे समोर आले आहे. याबाबत समजलेल्या माहिती नुसार, साक्रीरोडवरील अरुणकुमार वैद्य नगरात गुरुप्रसाद गुरुव्दारा जवळ मोहनलाल हिरवाणी यांचे निवासस्थान असून त्यांनी घराचे रिनोव्हेशनचे काम काढेल आहे. त्यामुळे जवळच एक घर घेवून सध्या ते राहण्यासाठी वापरत आहे. तर काम सुरु असलेल्या घरात रात्री मुलगा झोपत होता. पंरतू दोन दिवसापासून तो भत्तेपाल येथे सासुरवाडीला गेला. त्याच संधीचा ङ्गायदा घेत अज्ञात चोरटा वॉशिंग प्लेस म धून वरच्या मजल्यावर पोहचला आणि बंद रुमचा दरवाजा तोडून आत शिरला. आज मोहनलाल हिरवाणी हे सकाळी ते घरातील कामकाज पाहण्यासाठी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट ङ्गोडून त्यातून लाखो रुपये किंमतीचे ३० ते ४० तोळे सोन्याचे दागिणे आणि काही किंमती साहित्य चोरुन नेल्याचे आढळून आले आहे. यात २ ब्रेसल्टे, ८ अंगठी, २ चैन, हातातील कंगण असा ऐवज असल्याचे समजते. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच मोहनलाल हिरवाणी यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथक तसेच एलसीबी पथकानेही येथे पाहणी करीत चौकशी सुरु केली असून गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर