जळगावात १७ लाखांची गावठी दारू जप्त; ६२ गुन्हे दाखल
जळगाव, 01 जून (हिं.स.)शासनाने अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकत तब्बल १६ लाख ८२ हजार ९०५ रुपयांची अवैध गावठी दारू जप्त केली. या कारव
जळगावात १७ लाखांची गावठी दारू जप्त; ६२ गुन्हे दाखल


जळगाव, 01 जून (हिं.स.)शासनाने अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकत तब्बल १६ लाख ८२ हजार ९०५ रुपयांची अवैध गावठी दारू जप्त केली. या कारवाईत ६२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने अवैध मद्यमाफियांचे धाबे दणाणले आहे.जळगाव जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या थेट नेतृत्वाखाली २९ ते ३१ मे या अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत ही धडक मोहीम राबवण्यात आली. पथकाने जळगाव, भुसावळ आणि चोपडा तालुक्यात अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकले. या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध दारूनिर्मितीचे साहित्य आणि तयार मद्य आढळून आले. या मोहिमेदरम्यान एकूण ६२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांवर कडक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३९ हजार ९५ लिटर रसायन तसेच १ हजार ५२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १६ लाख ८२ हजार ९०५ रुपये असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. पुण्यातील दुर्घटनेनंतर अवैध मद्यविक्री आणि हातभट्ट्यांविरोधात राज्यभर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील ही मोहीम राबविण्यात आली. पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असून, अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande