यूपीआय व्यवहारांनी मे महिन्यात २९.९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला
नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)। युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) द्वारे होणारे व्यवहार मे महिन्यात विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवास आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या प्रभावामुळे या कालावधीत एकूण व्यवहारमूल्य 29.90 लाख को
UPI transactions hit record may


UPI transactions hit record may


नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)। युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) द्वारे होणारे व्यवहार मे महिन्यात विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवास आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या प्रभावामुळे या कालावधीत एकूण व्यवहारमूल्य 29.90 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, तर व्यवहारांची संख्या 23.2 अब्ज इतकी नोंदवली गेली.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उन्हाळी प्रवास आणि आयपीएलच्या उत्साहामुळे लोकप्रिय यूपीआयद्वारे होणारे व्यवहार विक्रमी पातळीवर पोहोचले. एनपीसीआयच्या माहितीनुसार, मूल्याच्या दृष्टीने व्यवहार 29.90 लाख कोटी रुपये आणि संख्येच्या (व्हॉल्यूम) दृष्टीने 23.2 अब्जांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी याच महिन्यात हे व्यवहारमूल्य 25.14 लाख कोटी रुपये होते, ज्यामुळे वार्षिक आधारावर 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात व्यवहारमूल्य 29.03 लाख कोटी रुपये होते.

आकडेवारीनुसार, मे महिन्यात 23.2 अब्ज व्यवहारांसह संख्येच्या दृष्टीनेही नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ही संख्या गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 18.67 अब्ज व्यवहारांच्या तुलनेत 24 टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल 2026 मध्ये व्यवहारांची संख्या 22.35 अब्ज होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या पेमेंट सिस्टम अहवालानुसार, यूपीआयद्वारे होणाऱ्या सरासरी व्यवहाराचा आकार 2021 मधील 1,848 रुपयांवरून 2025 मध्ये 1,313 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. मात्र, ही चिंतेची बाब नसून अधिक परिपक्व होत असलेल्या प्रणालीचे लक्षण मानले जात आहे.

सध्या यूपीआय संयुक्त अरब अमिरात (यूएई), सिंगापूर, भूतान, नेपाळ आणि मॉरिशससह सात देशांमध्ये कार्यरत आहे. एनपीसीआय ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांची संयुक्त पुढाकार संस्था असून, भारतातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालींचे संचालन करते. ही प्रणाली व्यक्ती आणि व्यापाऱ्यांमधील रिअल-टाइम व्यवहार शक्य करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande