श्रीराम फायनान्सची पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन सोबत भागीदारीची घोषणा
बेंगळुरू, 02 जून (हिं.स.)। देशातील तळागाळातील क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेडने पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनसोबत मुख्य प्रायोजक म्हणून महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. बेंगळुरू येथील पद
Shriram Finance Announces Partnership with Padukone School of Badminton


Shriram Finance Announces Partnership with Padukone School of Badminton


बेंगळुरू, 02 जून (हिं.स.)। देशातील तळागाळातील क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेडने पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनसोबत मुख्य प्रायोजक म्हणून महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. बेंगळुरू येथील पदुकोण-द्रविड क्रीडा उत्कृष्टता केंद्रात आयोजित कार्यक्रमात श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर आणि भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू पद्मश्री प्रकाश पदुकोण यांच्या उपस्थितीत या भागीदारीचे अनावरण करण्यात आले.

या सहकार्याद्वारे श्रीराम फायनान्स आपल्या आर्थिक समावेशन आणि समुदाय विकासाच्या ध्येयाचा विस्तार क्रीडा क्षेत्रापर्यंत करत आहे. देशभरातील तरुण खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तळागाळातील क्रीडा संस्कृती मजबूत करणे आणि नवोदित प्रतिभेला योग्य मार्गदर्शन मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या करारानुसार भारतातील सर्व विद्यमान आणि आगामी पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन केंद्रे आता श्रीराम फायनान्स प्रस्तुत पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन या नावाने कार्यरत राहतील.

भागीदारीअंतर्गत देशभरातील अकादमींमध्ये प्रशिक्षण घेणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी दोन हजारांहून अधिक विशेष ओळख असलेले टी-शर्ट वितरित करण्यात येणार आहेत. तसेच श्रीराम फायनान्सच्या प्रमुख प्रायोजकत्वाखाली १३ खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. याशिवाय दोन अखिल भारतीय यॉनेक्स स्पर्धांना सहप्रायोजक म्हणूनही कंपनीचे सहकार्य लाभणार आहे.

चार दशकांहून अधिक काळ लघुउद्योजक, किरकोळ कर्जदार आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम फायनान्सने ही भागीदारी मानवी क्षमतेमध्ये गुंतवणूक करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून केली आहे. या प्रसंगी उमेश रेवणकर यांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्रातील तरुणांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना शिस्त, समर्पण व आत्मविश्वासाच्या बळावर पुढे जाण्यास प्रोत्साहित करणे हे या सहकार्यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

सध्या पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन देशातील १८ शहरांमध्ये ७५ प्रशिक्षण केंद्रे चालवत आहे. या केंद्रांमध्ये नवशिक्या, मध्यम आणि उच्च कामगिरी स्तरावरील खेळाडूंसाठी संरचित प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. तांत्रिक कौशल्य विकास, चपळता, शारीरिक तंदुरुस्ती, स्पर्धापूर्व तयारी आणि प्रशिक्षक प्रमाणन कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील बॅडमिंटन परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी संस्था कार्यरत आहे. प्रकाश पदुकोण यांनी या भागीदारीमुळे संस्थेचा विस्तार अधिक वेगाने होईल आणि देशातील हजारो तरुण खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande