
जळगाव, 02 जून (हिं.स.) सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराचा सिलसिला कायम असून आज मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची भर पडली आहे. या वाढीनंतर सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख 55 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 2 लाख 67 हजार रुपये झाला आहे. जीएसटीसह सोन्याची किंमत 1 लाख 59 हजार 650 रुपये इतकी झाली असून चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 75 हजार 100 रुपयांवर गेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडी, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर