लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ महिन्यांची गर्भवती, रेवदंड्यात गुन्हा दाखल
रायगड, 11 जून (हिं.स.): रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर आर
Minor girl sexually assaulted under the pretext of marriage.


रायगड, 11 जून (हिं.स.):

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२५ ते १० जून २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादी अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत जुलै २०२५ मध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडित मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पॉक्सो) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४, ५(के)(आय), ६, १२ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(आय)(एम), ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंगज करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande