
आठ संशयितांना अटक : इंदिरानगर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी
नाशिक, 12 जून (हिं.स.)।
भूखंड मालकाच्या जागी बनावट इसम उभा करून , त्याचे आधार कार्ड मध्ये फेरफार करून मूळ मालकाचे नाव टाकुन रजिस्टर खताद्वारे मूळ मालकाची व भूखंड विकत घेणाऱ्या इसमाची फसवणुक करून भूखंड हडप करणाऱ्या दोघा वकिलांसह चौदा जणांच्या टोळीवर इंदिरा नगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे .
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचे मालकीचा वडाळागांव शिवारातील व सुधीर गुजराथी यांचे मालकीचा राजीव नगर येथील भुखंड मुळ मालक यांचे जागी बनावट इसम उभा करून बनावट इसमाचे आधारकार्डमध्ये बदल करून त्यांचे जागी मुळ मालकाचे नांव व पत्ता टाकुन आधारकार्ड अपडेट करून त्याआधारे बनावट बैंक खाते उघडले. तसेच भुखंड हे दुसऱ्या इसमास रजिस्टर खताव्दारे विक्री करुन मुळ मालकाची व विकत घेणाऱ्या इसमांची अशी दुहेरी फसवणुक केली . या गुन्ह्यांच्या तपासा दरम्यान आधारकार्ड अपडेट करण्याकरीता यातील संशयित आरोपी वकील हे प्रथम नावांत बदल करण्यासंदर्भातले महाराष्ट्र शासनाचे राजपत्र हे देखील बनावट करत होते. अशा प्रकारे नमुद आरोपींन आता पर्यंत नाशिक शहरात पाच गुन्हे केल्याचे व त्याव्दारे करोडो रूपयांची फसणुक केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहे. दोन्ही वकील गुन्हा घडल्यापासुन नाशिक शहरातुन फरार झाले होते . त्यांना गुन्हे शोध पथकाने भिवंडी, जि.ठाणे येथुन अटक केली आहे. संशयित आरोपींन अशाच प्रकारे अजुन नाशिक शहरात तसेच आजुबाजूचे परिसरात बनावट इसम उभा करून भुखंड घोटाळे केले असल्याची दाट शक्यता आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी ॲड .कपिल पाठक (वय-38 वर्षे, खोडेनगर, वडाळा शिवार) , ऍड अलमास करीम सैय्यद (वय-33 वर्षे, खोडेनगर, वडाळा शिवार, नाशिक) , रितेश संसारे ( रा. वडगाव पंगू, ता. जि. नाशिक ) , संतोष संजीवा हेगडे (बनावट नाव) मुळ नाव घनश्याम गजाराम गिल ( वय ६५ वर्षे व्यवसाय रिक्षा चालक, देवळाली कॅम्प ) ,ज्योती हेगडे (बनावट नाव) मुळ नाव शोभा शंकर मुकणे ( वय ६३, देवळाली कॅम्प, ता.जि. नाशिक ) ,भिमराव वाघमारे, (सिडको, पवननगर, मुळ गाव - गवळवाडी, ता.पाटोदा, जि.बीड ) , मुकेश जाधव, वय 38 वर्षे, व्यवसाय जमीन खरेद विक्री एजंट, (रा सिंहस्थनगर, सिडको ), रविंद्र अडागळे ( आनंदरोड, देवळाली कॅम्प, नाशिक), शरद मुठेकर (विद्यानगर, मखमलाबादरोड, नाशिक ) , बासीद करीम सैय्यद (, रा. खोडेनगर, वडाळा शिवार, नाशिक ) ,नईम करीम सैय्यद ( रा. खोडेनगर, वडाळा शिवार, नाशिक ) , करीम शरफोडीन सैय्यद ( रा. खोडेनगर, वडाळा शिवार, नाशिक ) , फिरोजा करीम सैय्यद ( रा. वडाळा शिवार, नाशिक ) , व सुधीर जमनादास गुजराती नावाचा बनावट इसम (आरोपीचे मुळ नाव बाबुभाई गुलाबभाई मुलताणी ( फारुखो मस्जिदजवळ, अमन सोसायटी सुरत गुजरात ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास गुन्हेशोध पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष फुंदे हे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV