काजल इंगळेचा मारेकरी निघाला तिचा सख्खा मावस भाऊच
अमरावती, 12 जून (हिं.स.)। तपोवन परिसरातील जंगलात २ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. डीएनए चाचणीच्या आधारे हा मृतदेह काजल जितेंद्र इंगळे (वय २२) या तरुणीचा असल्याचे स्पष्ट झा
काजल इंगळेचा मारेकरी निघाला तिचा सख्खा मावस भाऊच:


अमरावती, 12 जून (हिं.स.)। तपोवन परिसरातील जंगलात २ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. डीएनए चाचणीच्या आधारे हा मृतदेह काजल जितेंद्र इंगळे (वय २२) या तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर सखोल तपासानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. ११) दुपारी काजलच्या मावस भावाला अटक केली असून या गुंतागुंतीच्या हत्येचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना नवव्या दिवशी यश आले आहे.

चेतन सुनील थोरात (२३, रा. तेजस विहार, राजुरा) असे पोलिसांनी पकडलेल्याचे नाव आहे. चेतन हा काजलचा सख्खा मावस भाऊ आहे. काजल इंगळे ही मूळची विश्रोळी येथील रहिवासी होती. ती काही काळ राजुरा भागात भाड्याच्या खोलीत राहत होती. मे महिन्यात तिने ती खोली सोडली होती. काजलचे जून महिन्यात लग्न होणार होते. दरम्यान काही कामानिमित्त ती ३० मे रोजी अमरावतीत आली होती. त्यादिवशी ती राजुरा येथे राहणाऱ्या मावशीकडे, म्हणजेच चेतनच्या घरी थांबली होती. ३१ मे रोजी सायंकाळी सुमारे चार ते साडेचार वाजताच्या सुमारास चेतन काजलला सोबत घेऊन तपोवन परिसरात फिरायला गेला.

आयुक्तांनी केली चौकशी चेतनवर संशय बळावल्यानंतर गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी सुरू केली होती.दुपारी पोलिस आयुक्त राकेश ओला स्वतः गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी सुमारे अर्धा तास चेतनची सखोल चौकशी केली. यावेळी चेतनने खुनाची कबुली दिली आव्हान ठरलेल्या या हत्याकांडाचा उलगडा झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande