फिफा विश्वचषक २०२६: क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगालचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकरणार ?
नवी दिल्ली, ११ जून (हिं.स.) फुटबॉलच्या जगात असे क्वचितच एखादे यश शिल्लक असेल जे क्रिस्टियानो रोनाल्डोने मिळवलेले नाही, पण त्याच्या ट्रॉफींच्या संग्रहात अजूनही एका सर्वात मोठ्या सन्मानाची उणीव आहे. तो म्हणजे फिफा विश्वचषक. २०२६ चा विश्वचषक हा त्याचा
क्रिस्टियानो रोनाल्डो


नवी दिल्ली, ११ जून (हिं.स.) फुटबॉलच्या जगात असे क्वचितच एखादे यश शिल्लक असेल जे क्रिस्टियानो रोनाल्डोने मिळवलेले नाही, पण त्याच्या ट्रॉफींच्या संग्रहात अजूनही एका सर्वात मोठ्या सन्मानाची उणीव आहे. तो म्हणजे फिफा विश्वचषक. २०२६ चा विश्वचषक हा त्याचा सहावा आणि कदाचित शेवटचा विश्वचषक सहभाग असू शकतो. पोर्तुगाल १७ जून रोजी डीआर काँगोविरुद्ध आपल्या विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

पोर्तुगाल हा नेहमीच प्रतिभावान फुटबॉलपटूंचा संघ राहिला आहे, पण जागतिक स्तरावर तो आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलेला नाही. यावेळी, या प्रतिभेचे विजेतेपदांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यावर असणार आहे. २०२५ मध्ये नेशन्स लीग जिंकल्यानंतर, पोर्तुगाल पूर्ण आत्मविश्वासाने विश्वचषकात उतरत आहे. पात्रता फेरीत काही अडचणी असूनही, संघाने अंतिम टप्प्यात उल्लेखनीय पुनरागमन करून विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले होते.

मिडफिल्ड पोर्तुगालची ताकद

पोर्तुगालकडे ब्रुनो फर्नांडिस, विटिन्हा आणि जाओ नेवेस यांसारख्या खेळाडूंचा समावेश असलेली एक मजबूत मिडफिल्ड आहे. बर्नार्डो सिल्वा आक्रमणाला संतुलन देईल.

रोनाल्डोकडून संघाला मोठ्या अपेक्षा

कतार विश्वचषकाच्या तुलनेत यावेळी रोनाल्डोची भूमिका अधिक स्पष्ट आहे आणि तो संघाचा मुख्य फॉरवर्ड म्हणून खेळेल. स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याच्या जुन्या समस्येवर मात करणे हे पोर्तुगालपुढील सर्वात मोठे आव्हान असेल.

या फुटबॉलपटूंवरही लक्ष:

ब्रुनो फर्नांडिसने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या आहेत. जर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला साथ दिली, तर पोर्तुगाल बचाव भेदून पुढे जाऊ शकतो.

प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. बेल्जियमसोबतचा त्यांचा कार्यकाळ अपेक्षेप्रमाणे मानला गेला नाही. पण पोर्तुगालसोबत नेशन्स लीग जिंकल्याने नवीन आशा निर्माण झाल्या आहेत.

पोर्तुगालचा संभाव्य संघ

डिओगो कोस्टा, जोआओ कॅन्सेलो, रुबेन डायस, गोंसालो इनासिओनूनो मेंडेस, विटिन्हा, जोआओ नेवेस, ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा, राफेल लिओ, क्रिस्टियानो रोनाल्डो.

पोर्तुगालची विश्वचषकातील कामगिरी

सहभाग: 8 वेळा

सर्वोत्तम कामगिरी: तिसरे स्थान (1966)

एकूण सामने: 35

विजय: १७

पराभव: 12

सर्वाधिक सक्रिय गोल स्कोअरर: क्रिस्टियानो रोनाल्डो (१४३ गोल)

आता विश्वचषक जिंकून क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी अपूर्ण गोष्ट पूर्ण करतो का याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande