केज विधानसभा मतदारसंघाच्या लेकीने जिंकले जग... दुहेरी सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी!
बीड, 11 जून (हिं.स.)। केज विधानसभा मतदारसंघातील जिवाचीवाडी येथील कु. हिंदवी परमेश्वर चौरे हिने वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी सुवर्णपदक पटकावत देशाचा गौरव वाढविला आहे. ट्रेडिशनल ग्रुप आणि फॉरवर्ड बेंडिंग या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्र
Q


बीड, 11 जून (हिं.स.)।

केज विधानसभा मतदारसंघातील जिवाचीवाडी येथील कु. हिंदवी परमेश्वर चौरे हिने वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी सुवर्णपदक पटकावत देशाचा गौरव वाढविला आहे.

ट्रेडिशनल ग्रुप आणि फॉरवर्ड बेंडिंग या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिने आपल्या असामान्य प्रतिभेची जगाला दखल घ्यायला भाग पाडले आहे. एका छोट्याशा गावातून जागतिक मंचापर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. हिंदवीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे, तिच्या कुटुंबियांचे, प्रशिक्षकांचे आणि जिवाचीवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन.! भविष्यातही अशीच यशाची सुवर्णमालिका कायम राहो,

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande