रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्डसाठी ‘मरीन होमगार्ड’ सागरी सुरक्षा प्रशिक्षण
रत्नागिरी, 12 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” या विशेष सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आ
होमगार्डसाठी ‘मरीन होमगार्ड’ सागरी सुरक्षा प्रशिक्षण


रत्नागिरी, 12 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” या विशेष सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये होमगार्ड जवानांना आपत्कालीन परिस्थितीत करायचे बचाव व मदतकार्य, सागरी सुरक्षा तसेच कयाक बोटिंग (Kayak Boating) यांसंदर्भातील सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण अतिशय सखोलपणे देण्यात आले. या विशेष प्रशिक्षणामुळे होमगार्ड जवानांची सागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्याबाबतची कार्यक्षमता आता अधिक सक्षम होणार आहे.किनारपट्टी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सागरी सुरक्षेचे कवच मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचे पोलीस दलातर्फे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande