पुणे विभागात ब्लॉकमुळे १३, १४ जून रोजी नागपूर-पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द
अमरावती, 12 जून (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्डमध्ये डीसीएस कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आल्यामुळे १३ व १४ जून रोजी नागपूर-पुणे, पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीकर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्
Nagpur-Pune-Nagpur Express cancelled on June 13 and 14 due to a block in the Pune Division


अमरावती, 12 जून (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्डमध्ये डीसीएस कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आल्यामुळे १३ व १४ जून रोजी नागपूर-पुणे, पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीकर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांना आता इतर पर्यायी वाहनाचा वापर करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्ड येथे विद्यमान रेल्वे संरचनेतील डीडीएस पॉईंट क्र. २०८/२०९ बदलण्यासाठी तसेच यार्डमधील सिग्नल व पॉईंट व्यवस्थेच्याआधुनिकीकरणासाठी अंतर्गत महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी व सिग्नलिंग काम हाती घेण्यात येणार आहे. बडनेरा स्टेशनवरून पुण्याकडे जाणारी गाडी क्र. १२९३६ नागपूर ते पुणे एक्स्प्रेस १३ जून रोजी नागपूर येथून रद्द करण्यात आली आहे. हीएक्सप्रेस रात्री ९.१० वाजताच्या सुमारास बडनेरा स्टेशनवर येते. त्याचप्रमाणे गाडी क्र. १२९३५ पुणे ते नागपूर एक्सप्रेस १४ जून रोजी पुणे येथून रद्द करण्यात आली आहे. ही पहाटे ५३५ वाजताच्या सुमारास बडनेरा स्टेशनवर येते.

अमरावती-पुणे एक्सप्रेस हडपसर पर्यंतच धावणार

दररोज रात्री १०.५० वाजता निघणारी गाडी क्र. ११४०९ अमरावती - पुणे एक्सप्रेस १३ जून रोजी अमरावतीहून निघाल्यानंतर पुण्यात जाणार नाही तर हडपसर येथेच थांबेल. तेथून प्रवाशांना पर्यायी वाहनाने पुण्याला जावे लागेल. पुण्याला अमरावतीहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. कधी त्यांना तिकीट रद्द करावे लागत असून कधी पर्यायी वाहनांचा ऐनवेळी आधार घ्यावा लागत आहे. काहींना तर ऐनवेळी प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande