लातूरात स्थानिक तरुणांसाठी १४ जूनपर्यंत सुरक्षा रक्षक भरती
लातूर, 12 जून (हिं.स.)। सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा अॅक्ट २००५ च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त, भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरि
मेळावा


लातूर, 12 जून (हिं.स.)।

सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा अॅक्ट २००५ च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त, भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लिमिटेड यांच्या वतीने १४ जून २०२६ पर्यंत सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे

ज्या युवकांचे निवड झाली त्यांना लगेच नियुक्ती पत्र देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुख्याध्यपिका वैशाली सारणीकर, पत्रकार अनिल फुलारी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच

हायस्कूलच्या सहशिक्षिका सुनीता पाटील, वंदना कराड यांची यावेळी उपस्थिती होती. या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत नवीन भरती होणाऱ्या युवकांना नोकरी लागल्यानंतर १५ हजार रुपये मिळतील तसेच इतर सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी एफ पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे मिळणार आहे.

जे १५ हजार ते २४ हजार रुपयापर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सुविधा दिल्या जातील. ही भरती प्रक्रिया दि. १० ते १४ जून पर्यंत

सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत जिल्हा परिषद हायस्कूल सभागृह, रेणापूर, ता. रेणापूर जि. लातूर येथे सुरू राहणार आहे.

या संधीचा सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भरती अधिकारी महेशकुमार सरतापे, दिग्विजय मोहिते यांनी केले आहे. भरती पात्रता युवकांची कमीत कमी १० वी पास असावा, वय १८ वर्ष ते कमाल ४५ वर्ष., उंची १६५ सेमी पेक्षा जास्त, वजन ४८ किलो पेक्षा नसावे, युवक हा मेडिकली फिट असावा. भरतीसाठी कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स, १०/१२ वी / ग्रॅज्युशनचे मार्कशीट पैकी १ झेरॉक्स., पासपोर्ट साईझ २ फोटो घेऊन येणे. रजिस्टेशन फी ५०० रुपये (फक्त निवड होणाऱ्या युवकांसाठी) ठेवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande