अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी उद्योग व्यवसाय उभारणीस आर्थिक सहाय्य
पुणे, 12 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मार्जिन मनी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सहाय्यक आयुक्त, समाज
fgdf


पुणे, 12 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मार्जिन मनी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत कार्यान्वित करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प उभारणीसाठी अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५ टक्के रकमेपैकी कमाल १५ टक्के मार्जिन मनी (सबसिडी) राज्य शासनाकडून देण्यात येते. लाभार्थ्याने १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के अनुदान वितरित केले जाते.

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नवउद्योजकांनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२०-२९७०६६११ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande