पूर्णा स्थानकावर नवीन पादचारी उड्डाणपूलासाठी वाहतूक ब्लॉक; काही गाड्यांचे नियमन
परभणी, 12 जून (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत पूर्णा रेल्वे स्थानकावर 12 मीटर रुंदीच्या नवीन पादचारी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3 वरील गँगवे आणि सरळ रॅम्पच्या पायाभरणी
पूर्णा स्थानकावर नवीन पादचारी उड्डाणपूलासाठी वाहतूक ब्लॉक; काही गाड्यांचे नियमन


परभणी, 12 जून (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत पूर्णा रेल्वे स्थानकावर 12 मीटर रुंदीच्या नवीन पादचारी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3 वरील गँगवे आणि सरळ रॅम्पच्या पायाभरणीच्या कामासाठी प्रत्येकी तीन तासांचे तीन वाहतूक व वीज ब्लॉक मंजूर करण्यात आले आहेत. या कामामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परिचालनात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हे ब्लॉक 13 जून (शनिवार), 16 जून (मंगळवार) आणि 20 जून (शनिवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. या कालावधीत गाडी क्रमांक 22709 नांदेड-आंबअम्दौरा एक्सप्रेस 16 जून रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून हाताळण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक 17640 अकोला-काचीगुडा इंटरसिटी आणि 17642 नरखेड-काचीगुडा इंटरसिटी या गाड्याही प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून चालविण्यात येतील. गाडी क्रमांक 17661 ला चुडावा स्थानकावर 30 मिनिटे नियंत्रित करण्यात येणार असून ती पूर्णा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून हाताळली जाईल. तर गाडी क्रमांक 17641 ला नांदेड-चुडावा दरम्यान 30 मिनिटे नियंत्रित करण्यात येणार आहे. नवीन पादचारी उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णा स्थानकावरील प्रवाशांची ये-जा अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर होईल. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande