राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड.दीपक पटवर्धन बिनविरोध
रत्नागिरी, 12 जून (हिं.स.) | राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. युद्धजन्य परिस्थिती इंधनाचे
दीपक पटवर्धन


रत्नागिरी, 12 जून (हिं.स.) | राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली.

युद्धजन्य परिस्थिती इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत. अशा परिस्थितीत राज्यभर १९ हजार पतसंस्थांना योग्य असे मार्गदर्शन व नेतृत्व मिळाले आहे, असे उद्गार भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी काढले व ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले.

यावेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, महासचिव राजोबा सर, ज्येष्ठ संचालक दादाराव तुपकर यांच्यासह पतसंस्था फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते.

राज्य पतसंस्था फेडरेशनचच्ऊ अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किरण सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, आमदार प्रसाद लाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीसह संपूर्ण राज्यातून पटवर्धन यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande