
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)।
जालना भाजपा कार्यालय येथे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुक जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुहासशिरसाठ यांच्या प्रचारार्थ आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत राज्य व केंद्र शासनाने विकासाला नवी दिशा दिली आहे. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, जलसंधारण, शेतकरी कल्याण, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि जनतेच्या हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत.
विकास, पारदर्शक कारभार आणि जनकल्याणाचा ठसा उमटवणाऱ्या महायुतीच्या विचारांना अधिक बळ देण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुहासजी शिरसाठ यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी महायुतीचे उमेदवार श्री. सुहासजी शिरसाठ, आमदार श्री. अर्जुन खोतकर, आमदार श्री. बबनराव लोणीकर, आमदार श्री. संतोष दानवे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis