छ. संभाजीनगर : औरंगजेबाचे उदात्तीकरण , व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडदरम्यान एका युवकाचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित युवकाने भररस्त्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप होत असू
छ. संभाजीनगर : औरंगजेबाचे उदात्तीकरण , व्हिडिओ व्हायरल


छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडदरम्यान एका युवकाचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित युवकाने भररस्त्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप होत असून, रस्त्याच्या मध्यभागी वाहन उभे करून नागरिकांना अश्लील शिवीगाळ केल्याचेही दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित युवकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सत्यता आणि व्हिडिओतील घटनांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande