
बीड, 13 जून (हिं.स.)।शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बीड जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीतमहत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी व विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बी.एल.ए. नियुक्तीचा आढावा, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची तयारी, पदवीधर मतदारसंघातील संघटनात्मक स्थिती व नियोजन, तसेच स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा अहवाल जाणून घेत आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर सूचना केल्या. याप्रसंगी संपर्कप्रमुख परशुराम जाधव, पदवीधर समन्वयक दिलीप घुगे, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उल्हास गिराम, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, कुंडलिक खांडे, जिल्हा संघटक नितीन धांडे व महिला आघाडी जिल्हा संघटक मीरा नवले उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis