कार्यक्षम प्रशासनाला नैतिकतेची जोड हवी - डॉ.पंकजा वाघमारे
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। अलिकडच्या काळातील कार्यालयीन व्यवस्थापन हे आधुनिक, कार्यक्षम, गतीमान व स्मार्ट बनले आहे. प्रशासनाला पारदर्शकता व उत्तरदायीत्वासोबतच नैतिकतेची जोड असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ.
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। अलिकडच्या काळातील कार्यालयीन व्यवस्थापन हे आधुनिक, कार्यक्षम, गतीमान व स्मार्ट बनले आहे. प्रशासनाला पारदर्शकता व उत्तरदायीत्वासोबतच नैतिकतेची जोड असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ.पंकजा वाघमारे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजिवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने ’पंचसुत्र कार्यालय व्यवस्थापन मॉडेल’ या विषयावर सिफार्ट सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग ( NEP 2020) आणि उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट, नैतिक व व्यवस्थापित कार्यालयीन प्रशासन : कार्यक्षम कार्यालये • नैतिक कार्यसंस्कृती • सक्षम प्रशासन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. डिजिटल भारत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, ई-गव्हर्नन्स आणि संस्थात्मक उत्तरदायित्वाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षम, पारदर्शक, नैतिक आणि नागरिकाभिमुख प्रशासकीय व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. भारतीय व्यवस्थापन परंपरेतील मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आणि आधुनिक कार्यालयीन व्यवस्थापन तत्त्वांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ प्रसन्न पाटील. उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे व कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. अश्विन रांजणीकर यांची प्रमुख उपस्थित होती. तर मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ५ ए व्यवस्थापन तत्त्वज्ञानाचे भारतीय रूपांतर असलेले ठपंचसूत्र कार्यालय व्यवस्थापन मॉडेलठ. सजगता, सुव्यवस्था, स्वच्छता, संस्कार आणि सतत सुधारणा या पाच तत्त्वांवर आधारित हे मॉडेल कार्यालयीन कार्यक्षमता, शिस्त, नैतिकता आणि संस्थात्मक गुणवत्तावृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी डॉ.पंकजा वाघमारे यांनी ’पीपीटी’ सादर करुन विस्तृत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, काळानूरâप प्रशासनात मोठे फेरबद्दल घडून येत आहेत. गेल्या ३६ वर्षात जागतिकीकरणानंतर प्रशासनाचे अत्यंत वेगाने बदल झाले. ’ई-ऑफीस’, पेपर लेस ऑफीस यामुळे कामकाजाला गती मिळाली आहे. प्रशासनाला अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित बनवून ’कार्य संस्कृती’ रुजविणे गरजेचे आहे, असेही डॉ.वाघमारे म्हणाल्या.

डॉ.प्रसन्न पाटील म्हणाले, व्यवस्थापनाचे ’काूर्परेरायझेशन’ झाले असू नकारात्मक पध्दतीने म्हटले जाते. वास्तविक सरकारी, निमसरकारी प्रशासनही ’कॉर्पोरेट’ पध्दतीने होण्यास हरकत नाही. तर कायदे व नियम हे अडवणुकीचे साधन म्हणून नव्हे तर लोकांचे काम करण्यासाठी हे नियम असतात याची जाणीव ठेऊन प्रशासन व्हावे, असे अध्यक्षीय समारोपात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. सहसंचालक कार्यालय पूर्णतः ’ई-ऑफीस’ व पेपरलेस बनले आहे. आगामी काळात महाविद्यालय यांचे प्रशासनासाठी पेपर लेस करण्यात येणार असल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande