फिफा विश्वचषक 2026: इंग्लंड संघाच्या सामानाची चोरी,अमेरिकेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
वॉशिंग्टन, 13 जून (हिं.स.)२०२६ फिफा विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे सुरू झाला असून, चाहते फुटबॉल सामन्यांचा आनंद घेत आहेत. मात्र, काही वादही समोर येत आहेत. विशेषतः अमेरिकेत व्हिसा आणि फुटबॉलपटूंच्या तपासणीसंदर्भात समस्या निर्माण झाल्या आ
इंग्लंडचा फुटबॉल संघ


वॉशिंग्टन, 13 जून (हिं.स.)२०२६ फिफा विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे सुरू झाला असून, चाहते फुटबॉल सामन्यांचा आनंद घेत आहेत. मात्र, काही वादही समोर येत आहेत. विशेषतः अमेरिकेत व्हिसा आणि फुटबॉलपटूंच्या तपासणीसंदर्भात समस्या निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वचषक सामन्यांसाठी अमेरिकेत आलेल्या इंग्लंड फुटबॉल संघाच्या स्टार फुटबॉलपटूं बूट आणि मॅच बॉल चोरीला गेले आहेत.

इंग्लंडचा पहिला सामना १८ जून रोजी डॅलस येथील एटी अँड टी स्टेडियमवर ग्रुप एल मधीलच क्रोएशिया संघाविरुद्ध होईल. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा संघाचे साहित्य फ्लोरिडामधील त्यांच्या स्पर्धेपूर्वीच्या तळावरून मिसूरीमधील स्वूप सॉकर व्हिलेजमध्ये नेले जात होते. प्रशिक्षक थॉमस टुशेल यांचा संघ सराव करत आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये इंग्लंडच्या काही प्रमुख फुटबॉलपटूंच्या बुटांचा समावेश होता.

कॅन्सस सिटी पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला असून, या तपासाच्या संदर्भात दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले. एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले, पुढील तपास होईपर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संघ हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत काम करत आहे.

इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेसाठी विस्तृत लॉजिस्टिकल योजना तयार केली होती. मात्र, या चोरीमुळे संघाच्या सपोर्ट स्टाफसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथे प्रशिक्षण शिबिरानंतर इंग्लंड संघ अमेरिकेत दाखल झाला, जिथे त्यांनी टँपामध्ये न्यूझीलंड आणि ऑर्लँडोमध्ये कोस्टा रिकाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने जिंकले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande