
नांदेड, 13 जून (हिं.स.)।
सर्वोच्च न्यायालय यांच्यावतीने समाधान समारोह ची सुरूवात झाली आहे. त्यामध्ये दिनांक 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे विशेष लोकअदालत चे आयोजन करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात येणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे व पैशाचे महत्त्व लक्षात घेता या विशेष लोकअदालतीमध्ये प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे ज्यांची प्रकरणे प्रलंबित असतील त्यांनी आपला अमुल्य वेळ व पैसा वाचविण्यासाठी दोन्ही बाजुंच्या पक्षकारांनी थोडीसी माघार घेवून आपसात तडजोड घडवून आणन्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांचा अमुल्य वेळ व पैसा वाचेलच तसेच त्यांचा वाद त्यांच्या दोघांच्या सहमतीने मिटल्यामुळे आपसी हितसंबंध कायम राहण्यास मदत होईल.
अशी प्रकरणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व नरेन्द्र ब्रह्मे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली शरद देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांचे निजीकक्षात सदरील प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याबाबत पूर्व बैठकिची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
त्यानुषंगाने या पूर्व बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांस आवाहन करण्यात येत असून मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय परिसर नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा पुढे दिलेल्या गुगल लिंकद्वारे आभासी पध्दतीने उपस्थित राहून आपली प्रकरणे आपल्या जिल्हयातूनच मिटविण्यासाठी आलेल्या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शरद जी देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तसेच जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा. आभासी पध्दतीने व्हिडीओ कॉलद्वारे प्रकरणात सहभागी होण्यासाठीची गुगल लिंग https://meet.google.com/ myt-niru-ghp उपलब्ध करुन दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis