नांदेड - जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली
नांदेड, 13 जून, (हिं.स.)। जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभागामार्फत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ कार्यालय परिसरातून करण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती
अ


नांदेड, 13 जून, (हिं.स.)। जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभागामार्फत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ कार्यालय परिसरातून करण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कामगार विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रतिनिधी, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते तसेच इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विविध आस्थापना, हॉटेल्स, व्यावसायिक प्रतिष्ठाने व मॉल्स यांना भेटी देण्यात आल्या. बालकामगार न ठेवण्याबाबत संबंधित आस्थापनांकडून हमीपत्रे घेण्यात आली तसेच बालकामगार प्रतिबंधक संदेश असलेले स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande