छ. संभाजीनगर - जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद प्रकरण; १० उमेदवारांचे अपील दाखल
छत्रपती संभाजीनगर, 13 जून, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अवैध ठरविण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांविरोधात १० उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. निवडणूक छाननीदरम्यान एकूण ४५ अर्ज अवैध ठरविण्या
छ. संभाजीनगर - जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद प्रकरण; १० उमेदवारांचे अपील दाखल


छत्रपती संभाजीनगर, 13 जून, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अवैध ठरविण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांविरोधात १० उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. निवडणूक छाननीदरम्यान एकूण ४५ अर्ज अवैध ठरविण्यात आले होते.

अपील करणाऱ्यांमध्ये आमदार संजना जाधव, समीर सत्तार आणि सुवर्णा जाधव यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. या अपिलांवर १७ जून रोजी सुनावणी होणार असून त्यानंतर सहकार विभाग अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २३ जून असून ४ जुलै रोजी मतदान आणि ५ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande