अंबादास दानवेंनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यानंतर दानवे यांनी देवीचे दर्शन घेतले यावेळ
Q


छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यानंतर दानवे यांनी देवीचे दर्शन घेतले यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी, पराक्रम, शक्ती आणि भक्तीचे अधिष्ठान मानली जाते.अष्टभुजा धारण केलेले तेजस्वी रूप, करुणामय मातृत्व आणि दुष्टांचा संहार करणारी अदम्य शक्ती यांचा अद्वितीय संगम म्हणजे आई तुळजाभवानी.शक्ती, भक्ती आणि मातृत्वाचे अखंड प्रतीक असलेल्या आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक झालो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande