लातूर - हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांच्या सेवा पुस्तिकेत होणार नोंद
लातूर, 14 जून (हिं.स.)। लातूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी हेल्मेट वापराच्या सक्तीबाबत सुचना देत असताना लातूर जिल्हयातील सर्व प्रभारी अधीकारी यांना त्यांच्या अधीनस्थ असलेल्या प्रत्येक पोलीस अमलदार यांनी हेल्मेट वापरले पाहीजे. नाही वापर
हेल्मेट


लातूर, 14 जून (हिं.स.)।

लातूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी हेल्मेट वापराच्या सक्तीबाबत सुचना देत असताना लातूर जिल्हयातील सर्व प्रभारी अधीकारी यांना त्यांच्या अधीनस्थ असलेल्या प्रत्येक पोलीस अमलदार यांनी हेल्मेट वापरले पाहीजे. नाही वापरल्यास त्यांना शिक्षा देवून त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकामध्ये घेतली जाईल अशा सुचना देवून पोलीस निरीक्षक वहातूक शाखा यांना त्याची सुरूवात पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणावरून करण्यास बजावलेले होते.

या सर्व बाबींचा परीणाम हेल्मेट वापरावर झाला असून सर्व पोलीस अमलदार जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करत आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या हेल्मेट वापराचा आदर्श घेऊन स्वतःही हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande