पालखी मार्गाच्या सज्जतेचा प्रत्यक्ष आढावा !
पुणे, 15 जून (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी आगमन होणार असून परंपरेनुसार दोन दिवसांचा मुक्काम पुण्यनगरीत असणार आहे. या काळात वारकरी बांध
Murli


पुणे, 15 जून (हिं.स.)।

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी आगमन होणार असून परंपरेनुसार दोन दिवसांचा मुक्काम पुण्यनगरीत असणार आहे. या काळात वारकरी बांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि उत्तम सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी आज पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पुणे महानगरपालिका पदाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांसमवेत पालखी मार्गावरील सुविधा, सुरक्षा आणि व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट्स, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्थापन तसेच मुक्कामस्थळांवरील सुविधा याबाबत नियोजनबद्ध कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच नागरी सुविधा, पावसाळी कामे, अतिक्रमणे, बेवारस वाहनांची विल्हेवाट आणि वारकऱ्यांसाठी विश्रांती कक्ष उभारण्याबाबतही संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले.

वारकरी संप्रदायाची ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक आहे. लाखो वारकरी पुण्यातून मार्गक्रमण करणार असल्याने त्यांच्या सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ प्रवासासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने सर्व तयारी पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी दिल्या. वारकरी बांधवांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सोयीसुविधांसाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासन समन्वयाने कार्यरत असून, पुणे शहरात पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आणि सुनियोजित आयोजन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, आमदार श्री. हेमंतभाऊ रासने, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. श्रीनाथजी भिमाले, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, श्री. सोपान उर्फ काका चव्हाण यांच्या नगरसेवक, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande