नांदेड - भाजप प्रदेशाध्यक्षांकडून निवडणुकीचा आढावा
नांदेड, 14 जून (हिं.स.)। विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी नांदेडचा दौरा करून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या सद
नांदेड - भाजप प्रदेशाध्यक्षांकडून निवडणुकीचा आढावा


नांदेड, 14 जून (हिं.स.)।

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी नांदेडचा दौरा करून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आ. तुषार राठोड, आ. भीमराव केराम, आ. जितेश अंतापूरकर, मराठवाडा समन्वयक

तथा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्यबापू

देशमुख, नांदेड उत्तर जिल्हा प्रभारी किरण पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख,

भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर, मनपा गटनेते अॅड. महेश कनकदंडे, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, सुधाकरराव भोयर, मनपा स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महानगर सरचिटणीस विजय येवनकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात, महेश खोमणे आणि दिलीप ठाकूर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande