लातूर - सुकणी बस अपघात प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल
लातूर, 14 जून (हिं.स.)। उदगीर अहमदपूर रस्त्यावर सुकणी येथे बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले होते. या प्रकरणी वाढवणा पोलिस स्टेशन येथे बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीरहुन अहमदपूरकडे जाणारी एस टी बस क्र एमएच २० बीएल २
अपघात


लातूर, 14 जून (हिं.स.)।

उदगीर अहमदपूर रस्त्यावर सुकणी येथे बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले होते. या प्रकरणी वाढवणा पोलिस स्टेशन येथे बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीरहुन अहमदपूरकडे जाणारी एस टी बस क्र एमएच २० बीएल २०१८ चा चालक शिवर्लीग प्रभुअप्प मळभागे याने बस हायगाई व निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालवुन बस पलटी करून प्रवाशांना गंभीर मार लागुन जखमी केले.

याप्रकरणी कलम २८१,१२ (अ), १२५ (इ) कलमान्वे श्यामा भरत माने वय ३६ वर्ष व्या घरकाम रा डोनगाव ता. जळकोट यांच्या फिर्यादीवरुन एस टी बस क्रमांक एमएच २० बीएल २०१८ चा चालक शिवलींग प्रभुअप्प मळभागे अहमदपुर डेपो याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुकणी येथील नवीन पुलाचे काम चालु असलेल्या ठिकाणी झालेल्या बस अपघातात सत्यभामा बाबुराव तुरीवाले वय ८० वर्ष रा रोकडा सावरगाव, शोभा व्यंकटराव रडगीरे वय ६५ वर्ष रा किनी यल्लादेवी, चंद्रकला पंढरी सुर्यवंशी वय ३० वर्ष रा वाढवणा, वंदना भानुदास गोटमुखले वय ६० वर्ष वाढवणा, आनिता व्यंकट सुर्यवंशी वय ३० वर्ष रा देऊळवाडी ता. उदगीर, देविदास भानुदास राचमाले वय ६० वर्ष रा वायगाव ता उदगीर हे प्रवाशी जखमी झाले आहेत. सपोनि सो यांचे आदेशाने गुन्हा दाखल करुन तपास पोह/१२२ दळवे यांचेकडे देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande