
बीड, 14 जून (हिं.स.)। गेवराई तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे.पावसामुळे शेतजमिनींमध्ये ओलावा निर्माण झाला असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.तालुक्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे विहिरी, शेततळी व जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढली असून खरीप हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis