लातूर : निवाडा येथे खेत बचाव अभियानास प्रारंभ एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लातूर, 14 जून (हिं.स.)। एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावर्षी निर्माण झालेल्या एल नीनो परिस्थितीमुळे संभाव्य दुष्काळ व कमी पावसाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांच्या स
कार्यशाळा


लातूर, 14 जून (हिं.स.)।

एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

यावर्षी निर्माण झालेल्या एल नीनो परिस्थितीमुळे संभाव्य दुष्काळ व कमी पावसाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे निवाडा (ता. रेणापूर) येथे 'खेत बचाव अभियान' तसेच खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी

अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले की, पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया तसेच बीबीएफ पद्धतीवर पेरणी करणे

आवश्यक आहे. तसेच माती परीक्षण अहवालानुसार खतांचा संतुलित वापर करावा व खतांचा अतिवापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

एल नीनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, ठिबक व तुषार सिंचनाचा

शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

बैठकीत बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंग (आच्छादन) तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविण्याबाबत माहिती देण्यात आली.

अवलंब आणि ओलावा संवर्धनावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात व कमी कालावधीत येणारी पिके व वाणांची निवड करून आर्थिक नुकसान टाळावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संदीप देशमुख यांनी खरीप हंगामात उद्भवू शकणाऱ्या कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी

व कमी पावसावर घाईघाईने पेरणी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी वैभव चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी राजश्री कांबळे, एम. एम. माळी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande