
नांदेड, 14 जून (हिं.स.)
नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. अधीक्षक एस. एल. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तब्बल १४० ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत १४२ आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे १० लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण जिल्हा हातभट्टीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्यातील कार्यकारी निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व भरारी पथकान कारवायांचे सत्र राबवले असून, यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षात वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत दारू माफियांची यादी तयार करण्यात आली
अटक आरोपी : १४२
हातभट्टी दारू: १,०९८ लिटर
रसायन (सडवा): १३,१२० लिटर
देशी/विदेशी मद्य व बिअर २५३ लिटर
पेक्षा अधिक.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत ३९ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (बॉन्ड) लिहून देऊनही उल्लंघन करणाऱ्या ६ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारची
अवैध मद्य खरेदी करू नये. जिल्ह्यात कुठेही बनावट, अवैध किंवा परराज्यातील दारूची विक्री होत असल्यास नागरिकांनी कार्यालयाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis