
नांदेड, 14 जून (हिं.स.)।
सुदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त भारत घडविण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २४ जून रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतू, गोवर्धनघाट येथे २७व्या भव्य चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून स्पर्धकांना दोन किलोमीटर अंतर चालायचे आहे. स्पर्धेसाठी पुरुष, महिला, ज्येष्ठ
नागरिक, अमरनाथ यात्रेकरू तसेच माध्यम आले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास स्नेहलता जायस्वाल यांच्या तर्फे आकर्षक मोबाईल बक्षीस नोन देण्यात येणार आहे. तसेच प्रथम, द्वितीय दिन व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना विजयसिंह अ परदेशी यांच्या तर्फे स्मृतिचिन्हे प्रदान क करण्यात येतील. स्पर्धेत वेळेवर उपस्थित व्य राहणाऱ्या पहिल्या २०० स्पर्धकांना नि आकर्षक टी-शर्ट देण्यात येणार आहेत. अमरनाथ यात्रेच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून नियमित चालण्याची सवय लागण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. वैध स्पर्धेसाठी नावनोंदणी स्पर्धास्थळी सकाळी देण ५.४५ वाजता करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis