गडावर प्रगतीपथावर असलेल्या विविध विकासकामांची पाहणी
बीड, 15 जून (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज सोमवती अमावस्येच्या पावन निमित्ताने श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे जाऊन बडे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच गडावर प्रगतीपथावर असलेल्या विविध विकासकामांच
अ


बीड, 15 जून (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज सोमवती अमावस्येच्या पावन निमित्ताने श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे जाऊन बडे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

तसेच गडावर प्रगतीपथावर असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच परिसराचा विकास अधिक गतिमान व्हावा यासाठी कामांचा आढावा घेतला.बडे बाबांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना. असे त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विकास कामांची पूर्तता केली जाईल यासाठी आपण पाहणी दौरा केला असल्याचे आमदार धस यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande