
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)।
बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी
सोमवती अमावस्या या पवित्र पर्वानिमित्त आज सहपत्नी श्री शैनेश्वर मंदिर येथे श्री शनिदेवांचा अभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी शनिदेवांच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंदमय जीवन आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.
सोमवती अमावस्येचे धार्मिक महत्त्व अत्यंत विशेष मानले जाते. या पावन दिवशी शनिदेवांचे पूजन, अभिषेक व दर्शन करण्याचे भाग्य लाभल्याने मन प्रसन्न झाले. श्री शनिदेवांच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत, कष्टांचे निवारण होवो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती व यश नांदो हीच प्रार्थना.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis