पुणे-स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
पुणे, 02 जून (हिं.स.)बहुचर्चित स्वारगेट एसटी स्थानक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याच्याविरुद्ध न्यायालयाने दोषारोप निश्चित केले आहेत. विशेष सरकारी वकिलांनी ८७ साक्षीदारांची यादी आणि आरोपीविरोधातील पुरावे न्यायालयात सादर केले असून,
evm


पुणे, 02 जून (हिं.स.)बहुचर्चित स्वारगेट एसटी स्थानक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याच्याविरुद्ध न्यायालयाने दोषारोप निश्चित केले आहेत. विशेष सरकारी वकिलांनी ८७ साक्षीदारांची यादी आणि आरोपीविरोधातील पुरावे न्यायालयात सादर केले असून, या खटल्याची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. फेब्रुवारी २०२५ रोजी स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने सकाळी सुमारे पावणेसहा ते पावणेसात या कालावधीत तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. तो आपल्या मूळ गावी शेतात लपून बसल्याची माहिती तपासात समोर आली होती.पुणे पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सुरुवातीला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पुढे त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करत पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५२ दिवसांत ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून एकूण १२ पंचनामे करण्यात आले आहेत.आरोपपत्रातील महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज तसेच साक्षीदारांची निवेदने यांचा समावेश आहे. या पुराव्यांच्या आधारे आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे थेट आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर मांडले आहेत.दोषारोप निश्चित झाल्यानंतर आता खटल्याच्या नियमित सुनावणीस सुरुवात होणार असून, १५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande